परंपरा, ज्ञान आणि आधुनिकतेचा संगम
आमचे मार्गदर्शक आणि कुशल सहकारी भक्ती, संस्कृती आणि वाचनपरंपरेची सेवा एकाच ध्येयाने पुढे नेत आहेत.
कृतज्ञतापूर्वक पुण्यस्मरण
वै. ह.भ.प. प. पू. गुरुवर्य मधुकर महाराज शिंपी
वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांचे शिक्षक व विश्वस्त. त्यांच्या संस्कार, मार्गदर्शन आणि भक्तीपरंपरेच्या स्मृतींना कृतज्ञतापूर्वक अभिवादन.
|| श्री ||
आमच्याबद्दल
Alandi Books Publications हे मराठी संत साहित्य, भक्तीपर ग्रंथ आणि वारकरी परंपरेशी जोडलेले प्रकाशन कार्य पुढे नेणारे आध्यात्मिक पुस्तक केंद्र आहे.

संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO)
ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मधुकर खैरनार (शिंपी)
लेखक, संपादक,मालक,मुद्रक आणि प्रकाशक
प्रकाशनाचा प्रवास
वै. ह.भ.प. प. पू. गुरुवर्य मधुकर महाराज शिंपी (शिक्षक, विश्वस्त व चिटणीस वा. शि. संस्था, आळंदी देवांची) यांचे सुपुत्र श्री. ह.भ.प. डॉ. ज्ञानेश्वर मधुकर खैरनार (शिंपी) (होमिओपॅथिक तज्ञ) हे आळंदी देवांची येथे होमिओपॅथिक तज्ञ म्हणून कार्यरत असताना गेल्या वीस वर्षापासून धार्मिक पुस्तकांच्या प्रकाशनाचा व्यवसाय योगिराज प्रकाशन नावाने करीत आहेत. नुकतेच त्यांनी ‘सोनेरी उपासना बुक पब्लिकेशन’ नावाचा आपला नवीन उद्योग सुरु केलेला आहे.
समाजातील सर्व स्तरांतील जनसामान्य बंधु भगिनी यांना भारतीय संस्कृतीतील संत साहित्य वाङ्मयाची ओळख व्हावी व समस्त मानवी मनाला आपल्या कल्याणाकडे अग्रेसर होता यावे या साठी डॉ. खैरनार यांची धडपड सुरु आहे.
दुष्टबुद्धीचा नाश आणि चांगुलपणाची वृद्धी करणारे एकमेव मराठी वारकरी मासिक ‘मैत्र्य जीवांचे’ नऊ वर्षापासुन ते मोठ्या सायासाने चालवित आहेत.
नवोदित लेखक, जिज्ञासू भक्त जनांसाठी त्यांच्या मनात नवनवीन उपक्रम राबविण्याचा प्रयत्न चालू असून नवोदित लेखकांच्या नवोदित लेखन प्रकाशनात सहाय्यभूत होण्याचा त्यांचा संकल्प आहे. पुढच्या वाटचालीसाठी ज्यांना मार्गदर्शन अपेक्षित असेल त्यांनी डॉ. खैरनार यांच्या कडे संपर्क साधावा.
विपणन व्यवस्थापन (Marketing Executive Profile)
श्री. योगिराज ज्ञानेश्वर खैरनार
हे योगिराज प्रकाशन, आळंदी देवाची या संस्थेत ‘मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’ (Marketing Executive) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी आपले उच्च शिक्षण BCA आणि PGDM (फायनान्स) मधून पूर्ण केले आहे. आपल्या व्यावसायिक कौशल्याने आणि आधुनिक दृष्टिकोनाने फर्मच्या विपणन (Marketing) व्यवस्थेची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.

